23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रआषाढीसाठी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या

आषाढीसाठी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या

एकमत ऑनलाईन

परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ न शकलेले वारकरी यंदा मोठ्या प्रमाणात पंढरपूरला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज दिली. ६ ते १४ जुलैदरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील रिंगण सोहळ््यासाठीही ८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणा-या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेसही उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारक-यांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. त्याकरिता या गाड्या सोडण्यात येणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी औरंगाबाद-१२००, मुंबई- ५००, नागपूर-१००, पुणे-१२००, नाशिक-१००० तर अमरावती येथून ७०० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलकङ्घ अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अधिकाधिक भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या