24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्धची मालिका खिशात

इंग्लंडविरुद्धची मालिका खिशात

एकमत ऑनलाईन

तीन सामन्यांची मालिका, दुस-याही सामन्यात भारताचा विजय
बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीसमोर इंग्लंड फलंदाजांची चांगलीच दमछाक उडाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सलग १४ वा सामना जिंकला आहे.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. रवींद्र जडेजाने २९ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची लाज वाचवली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तळ ठोकून फलंदाजी करू शकला नाही आणि निर्धारित षटकांत १२१ धावाच करता आल्या. परिणामी भारताने ४९ धावांनी विजय मिळवून सामन्यासह मालिका खिशात घातली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ आणि डेव्हिड विलीने नाबाद ३३ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीन तर जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. इंग्लंडवर भारताचा हा सलग चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका विजय ठरला. ज्यात २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २-१ ने जिंकलेला आणि दोन घरच्या मालिका विजयाचा समावेश आहे.

विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांसाठी दीपक हुडा आणि इशान किशन यांना डावलले गेल्याने भारताच्या दुस-या टी-२० सामन्याच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, इंग्लडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित ब्रिगेडने येताच इंग्लंड गोलंदाजांवर जोरदार मारा सुरु केला.

तत्पूर्वी, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रवींद्र जडेजाने २९ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची लाज वाचवली. ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत भारतीय डावाची सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला झंझावाती सुरुवात करून दिली. पण इंग्लंडकडून पदार्पण करणा-या रिचर्ड ग्लीसनने रोहित (३१), कोहली (१) आणि पंत (२६) यांना बाद करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या