मुंबई : : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा संपन्न झाली.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात विठूरायाची ही पहिलीच शासकीय पूजा आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना कुठल्याही राजकीय बाबींवर वक्तव्य न करण्यास सांगितले तर पंढरपूरच्या पुढील विकासाची रूपरेषा ही कशी असेल याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना कुठल्याही राजकीय बाबींवर वक्तव्य न करण्यास सांगितले तर पंढरपूरच्या पुढील विकासाची रूपरेषा ही कशी असेल याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. नंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.