25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeउस्मानाबादउमरग्यात कंपनीची ४५ कोटींची मालमत्ता जप्त

उमरग्यात कंपनीची ४५ कोटींची मालमत्ता जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर शुक्रवारी ईडीने कारवाई केलीे. उमरगा एमआयडीसीमधील खासगी कंपनी जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची ४५.५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे, तर गेल्या ५-६ वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

कोल्हापूर येथील उमेश धोंडिराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता-पुत्र संचालक असलेल्या फॅक्टरीची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करून कारवाईची माहिती दिली. उमरगा एमआयडीसीमध्ये हैदराबाद-मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे.

मनी लॉंड्रिंग कायदा २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कंपनी कायद्यांतर्गत जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५ मार्च २००९ रोजी नोंदणी केली आहे. त्यानुसार १५ कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे, तर पेड कॅपिटल २ कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झाली असून ३१ मार्च २०२१ पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे, तर १३३६०२ हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सअंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा उद्देश आहे.

उमरग्यात प्रथमच कारवाई
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे प्रथमच ईडीची मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद तालुक्यातील दुमले जवळा येथे असलेली १५० एकर जमीन व त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. मलिक सध्या तुरुंगात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या