Tuesday, September 26, 2023

कोरोना : ग्रामीण भागात धाकधुक वाढली

देगलूर : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व शहरात कामासाठी गेलेल्या मजुरांची उदरनिर्वाची व्यवस्था होत नसल्याने मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आदी ठिकाणावरून मजुरांचे ताफे आता आपल्या जन्मभूमी कडे येत आहेत. परिणामी आता ग्रामीण भागातील ग्रामस्थांची धडकन वाढली आहे.

रेडझोन क्षेत्र म्हणून मुंबई-पुणे अग्रस्थानी असून जास्तीत जास्त मजूर या भागात आपला उदरनिर्वाह करीत होते. वाटेल ते पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते. मात्र २२मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच सर्व वाहने बंद झाल्याने गावाकडे जाण्याचा वाटा बंद झाल्या होत्या. मात्र आता शासनाने मजुरांना मोफत घरी पाठवण्याची व्यवस्था केल्याने शहरातून मजुरांचे ताफे आता ग्रामीण भागात येत आहेत.

Read More  भाजीविक्रीला जाताना अपघातात ६ शेतकरी ठार

जे मजूर रेडझोन मधून आले त्यांच्या बाबत साशकता निर्माण होत आहे. असे मजूर आपल्या गावाकडे येत आहेत. याबाबत सर्व ग्रामपंचायतींनी दक्षता बाळगून आलेल्या मजुरांचे गावातील शाळेत, गोठ्यात १४ दिवसासाठी विलगीकरण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या आरोग्य तपासणी वेळोवेळी करणेही गरजेच्या आहेत. नसता खेडेगावात ही महामारी पसरण्याची व गावे उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शहरातून आलेले मजूर सरळ घरीच जात असून ग्रामपंचायतींना जुमानत नसल्याचे बोलल्या जात आहेत. देगलूर तालुक्यातील अनेक गावात शहरातून आलेल्या मजुरांची संख्या मोठी आहे.

विलगीकरण आवश्यक !
देगलूर तालुक्यातील अनेक गावात मुंबई, पुणे, नाशिक ,औरंगाबाद अधिक औद्योगिक नगरातून कामगार मजूर परतत आहेत यातील अनेकजण थेट घरी जात आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य तपासणी होत नाही. परिणामी गावात करण्याचा धोका वाढत आहे. यावर उपाय म्हणून परतणार्‍या प्रत्येकांची विलगीकरण आवश्यक झाले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या