25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रखडकवासला धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात

खडकवासला धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात

एकमत ऑनलाईन

  शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे : पुण्यात काल (११ जुलै) झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.

आता आम्ही आज दुपारी १२ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ३,४२४ क्युसेक विसर्ग वाढवून ठीक ५९९२ क्युसेक करण्यात येत आहे,
असे स्वारगेटच्या मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.
पुणे शहराच्या आजूबाजूला चार महत्त्वाची धरणं आहेत. त्यात खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांचा समावेश आहे.

पानशेत ३५.८२ टक्के पाणीसाठा, वसरगाव ३३.५८, टेमधर २१.८८ आणि खडकवासला धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या