25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रखा. संजय राऊत यांना पुन्हा समन्स

खा. संजय राऊत यांना पुन्हा समन्स

एकमत ऑनलाईन

आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश
मुंबई : एकीकडे शिवसेनेतील आऊटगोईंग संपायचे नाव घेत नाही, तर दुसरीकडे त्यांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याचे चित्र आहे. पत्राचाळ घोटाळ््याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणा-या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे. त्यासंदर्भात सध्या खा. संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या