25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयठाकरे म्हणाले, मलाही युती करायचीय

ठाकरे म्हणाले, मलाही युती करायचीय

एकमत ऑनलाईन

युतीसाठी ठाकरेंची मोदींशी १ तास चर्चा, खा. शेवाळेंचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत युतीबाबत जून २०२१ मध्ये एक तास चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती. पण संजय राऊत यांनी खोडा घातल्याने युती होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल शेवाळे यांनी हे वक्तव्य केले. वारंवार युतीची चर्चा झाली, तेव्हा मलाही युती करायचीच आहे, असे त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, असे गौप्यस्फोट करतानाच त्यांनी २०१९ च्या वचननाम्याचे वाचन यावेळी केले.

बंडखोर खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा
शिवसेनेचे बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कार्यालयासह घराबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत घडलेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद राज्यात उमटू नये, यासाठी खासदारांना सुरक्षा देण्यात आली आहे.

शिंदे गटात सामिल १२ खासदार
खा. कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील

६ खासदार ठाकरेंसोबत
संजय जाधव-परभणी, राजन विचारे-ठाणे, गजानन किर्तीकर-मुंबई उत्तर पश्चिम, अरविंद सावंत-मुंबई मध्य, ओमराजे निंबाळकर-उस्मानाबाद, विनायक राऊत-रत्नागिरी

सेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न : ठाकरे
भाजपच्या मदतीने शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भाजपच्या या कटाला शिवसेनेचे काही नेते बळी पडले आहेत. ते पक्षाचे नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणी माझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर मी सर्वकाही देईन. पण कुणी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व पक्षाच्या बंडखोर आमदारांवर कडाडून हल्ला चढवला. १२ खासदारांच्या बंडानंतर शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या