हरिद्वार : हरिद्वारममध्ये द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पोलिसांनी जितेंद्रसिंह त्यागीला अटक केली. दरम्यान अटकेची कारवाई केल्यानंतर यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सर्व मरणार, अशा शब्दांत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात यती नरसिंहानंद आरोपी आहेत.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे वादग्रस्त यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिमांविरोधात विधाने करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यागीला अटक केली. त्यागीला याआधी वसीम रिझवी नावाने ओळखले जात होते. दरम्यान, यती नरसिंहानंद आणि साध्वी अन्नपूर्णा यांनाही नोटीस बजावली आहे.