22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयदेशाची लोकसंख्या स्थिरावतेय

देशाची लोकसंख्या स्थिरावतेय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतासारख्या मोठ्या देशात बेरोजगार तरुणांची समस्या मोठी आहे. वाढती लोकसंख्या आणि त्याप्रमाणात रोजगारात न होणारी वाढ यामुळे ही समस्या उग्र होत चालली आहे. मात्र आता त्यावर दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. भारताचा एकूण प्रजनन दर जवळपास दोनच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिरावणार आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ चे आकडे केंद्र सरकारने बुधवार दि. २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहेत. सर्वेक्षणातील डाटानूसार २०१६ मध्ये राष्ट्रीय प्रजनन दर २.२ वर होता. जो आता कमी होऊन दोनवर आला आहे. म्हणजेच सरासरी एका महिलेने आपल्या आयुष्यभरात मुलांना जन्म देण्याचे प्रमाण २.२ वरुन दोनवर आले आहे. याचा अर्थ असा आहे की, देशातील लोकसंख्या आता जवळपास स्थिर होत आहे. म्हणजेच त्यातील वाढ ही खूपच साधारण आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ च्या दुस-या टप्प्यातील आकडेवारीनुसार, गर्भनिरोधक प्रसार दर म्हणजेच आता ५४ टक्क्यांवरुन वाढून ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०१५ आणि २०१६ च्या दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय प्रजनन दर हा राष्ट्रीय स्तरावर २.२ होता. पाचवा सर्व्हे हा २०१९ ते २१ दरम्यान केला गेला. यामध्ये प्रजनन दर कमी होऊ न २.१७९ वर आल्याचे आढळून आले. चौथ्या टप्प्यापेक्षा ही घट ०.९५० ने कमी आहे. याआधी २०१९ वरुन २०२० मध्ये झालेली घट ९.०० तर त्याआधीच्या वर्षात ०.८९० इतकी होती. याचा अर्थ जसजशी नवीन वर्षे येत आहेत, तसतशी राष्ट्रीय प्रजनन दरात होणारी घट ही दरवर्षी आधीपेक्षा जास्त आहे.

वाढते बालविवाह संकट निर्माण करणार
देशातील १७ राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात बिहार, मणिपूर, मेघालय ही तीन राज्ये सोडली तर अन्य १४ राज्यांत प्रजनन दर २.१ पेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. मात्र अशी परिस्थिती असली तरी अचानक काही बाबींमध्ये झालेली वाढ चिंता वाढवणारी आहे. बालविवाहांचे प्रमाण पुन्हा वाढत असून त्रिपुरात ते २०१५-१६ मधील ३३.१ वरुन २०२१ मध्ये ४०.१ टक्केवर गेले आहे. हेच प्रमाण मणिपूरमध्ये १३.७ वरुन १६.३ टक्के,आसाम ३०.८ वरुन ३१.८ टक्के, प.बंगाल ४१.६ टक्के तर बिहारमध्ये ४०.८ टक्के आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या