37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये ब्रीच कॅन्डी रुग्णालयाला आग

नाशिकमध्ये ब्रीच कॅन्डी रुग्णालयाला आग

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यात मकरसंक्रांतीचा उत्साह सुरू असताना शुक्रवारी नाशिकमध्ये रुग्णालयाला आग लागण्याची घटना घडली. नाशिकमधील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयाच्या तळमजल्यात आग लागली. पण सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात नियंत्रणात आग आणली आहे.

नाशिकमधील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या तळमजल्याला आज दुपारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडायला लागल्याने एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाच्या परिसरात धाव घेतली आणि तातडीने आग आटोक्यात आणली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या