25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; २० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; २० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत होता, मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु असून शिरसगाव-मुरंबी रस्त्यावरील घोडनदीला जोडणा-या उपनदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे जवळपास २० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गोदामाई खळाळली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे गोदाकाठी अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरिला देखील पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या होळकर पुलाखालून ७ हजार क्युसेकने पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या