25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयनिवडणूक आयोगाविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात

निवडणूक आयोगाविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात

एकमत ऑनलाईन

आदेशाला स्थगिती देण्याची केली मागणी
नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची महिती आहे.

निवडणूक आयोगाने शिवसनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आयोग या सर्व प्रकरणाची सुनावणी करणार होते. शिवसेना नेमकी कोणाची, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे, ही सर्व लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू झाली होती. शिवसेनेशी संबंधित मातोश्री गटाने सांगितले की, पक्षाशी निगडित अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय होईल, त्यामध्ये पक्षावरती कोणाचे प्राबल्य आहे, याच्याशी संबंधित ब-याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे शिवसेनेने आयोगाच्या या नोटिशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचे ठरले आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात उद्या (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करतील. त्यांची पहिली प्रमुख मागणी ही असेल की, आयोगाच्या या नोटिशीला स्थगिती द्यावी.

सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार?
या सर्व प्रलंबित प्रकरणी आधी सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशातच आता शिवसेनेला दिलासा देत आयोगाच्या या नोटिशीत सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या