24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeपरभणीबस-ट्रॅव्हल्सचा अपघात, २५ जखमी

बस-ट्रॅव्हल्सचा अपघात, २५ जखमी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड-परळी रोडवर दुर्घटना
परभणी : गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटीजवळ बस आणि ट्रॅव्हल्स अपघातात जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, दि. २८ जुलै रोजी रात्री घडली. जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड-अंबाजोगाई आणि परभणी येथे पाठवण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश मूलुरवार यांनी दिली.

गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटीजवळ नांदेडहून पुण्याकडे जाणा-या माऊली ट्रॅव्हल्स आणि बसमध्ये अपघात झाला. या अपघातात बस आणि ट्रॅव्हल्स मधील जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रात्री ११ वाजेपर्यंत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी गंगाखेड आणि सोनपेठ पोलिस पोहोचले.

जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड, अंबाजोगाई आणि परभणी येथे हलविण्यात आले. दरम्यान अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळतात गंगाखेड पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या