25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeहिंगोलीबॅकांची रोकड पुराच्या पाण्यात भिजली

बॅकांची रोकड पुराच्या पाण्यात भिजली

एकमत ऑनलाईन

हिंगोली जिल्ह्यात एसबीआयसह इतर बँकांना फटका
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील एसबीआय बँक आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत आसना नदीचे पाणी गेल्याने बँकेतील १२ लाख २२ हजार रुपयांची रोकड भिजली आहे. शिवाय बँकेतील फाईलदेखील भिजल्या असून संगणकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून हिंगोलीत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे कुरुंदा गावातील अनेक घरांमध्ये आसना नदीचे पाणी शिरले होते. हे पाणी एसबीआय, जगद्गुरु पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले. त्यामुळे शिवेश्वर बँकेचे २२ हजार रुपये आणि जगद्गुरू पतसंस्थेचे १२ लाख रुपये भिजल्याची माहिती बँकेच्या अधिका-यांनी दिली.

आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा गावात जवळपास चार ते पाच फूट पाणी शिरले होते. गावात नदीकाठची काही घरे पाण्याखाली गेली होती. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या