19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयभारतात बनावट नोटांचा शिरकाव!

भारतात बनावट नोटांचा शिरकाव!

एकमत ऑनलाईन

पाकिस्तानचा डाव, बनावट नोटा उच्च दर्जाच्या
नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करण्यासाठी शेजारी देशांनी पुन्हा एकदा भारतात बनावट नोटांचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. या वेळी अशा बनावट नोटा सीमेपलीकडून भारतीय बाजारात फिरत असून, त्या अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. सामान्य माणूस या नोटा सहज ओळखू शकत नाही. ही बाब देशासाठी चिंतेची बनली आहे.

भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेस नाशिकने अलीकडेच दिल्लीतून सापडलेल्या काही बनावट नोटांची तपासणी केल्यानंतर आपल्या विशेष अहवालात याची पुष्टी केली. हा अहवाल गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमार्गे बनावट नोटा भारतात येत असल्याचे समोर आले आहे.

नोटांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आझम याला अटक केली. या नोटा पडताळणीसाठी करन्सी नोट प्रेस नाशिक येथे पाठवण्यात आल्या होत्या. नाशिकमधील चलन तज्ज्ञांनी या नोटा तपासल्या असता या नोटांमध्ये मुख्य वॉटरमार्क, छुपा वॉटरमार्क, डेमो अंक, इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आणि मूळ नोटेप्रमाणेच लांबी आणि रुंदी आढळून आली. कागदाचा दर्जाही मूळ नोटेसारखाच होता. यामध्ये सुरक्षा धागाही मूळसारखाच होता. इतकेच नाही तर नोटांवरील मूळ क्रमांप्रमाणेच अनुक्रमांकही वेगळे होते. फक्त बनावट नोटेची जाडी ख-या नोटेपेक्षा थोडी जास्त असल्याचे आढळून आले. छपाईच्या रचनेच्या आकारातही फरक आढळून आल्याचे सांगण्यात आले.

नेपाळमार्गे बिहारमध्ये बनावट नोटा
एनआयएला तपासादरम्यान माहिती मिळाली की, मार्च-एप्रिल महिन्यात बनावट नोटांची एक खेप नेपाळमार्गे बिहारमध्ये पोहोचली होती. ही खेप देशभरातील मोठ्या महानगरांमध्ये पसरवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील रईसुल आझम याच्याकडे जानेवारी-२०२२ मध्ये ३ लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या ५९६ नोटा घेऊन दिल्लीत आला होता.

नेटवर्कचा शोध सुरू
नेटवर्कशी जोडलेल्या संशयितांचा शोध
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यासाठी एनआयएचे एक पथक यापूर्वी बिहारमधील चंपारण भागातही गेले होते. येथून देशातील अनेक शहरांमध्ये अशाच बनावट नोटा पसरवल्या जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली. आता संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या