नाशिक : या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळले आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचे राजकारण संपले आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि भाजपला लगावला आहे.
राऊत म्हणाले, नाशिक रामाची भूमी आहे, पण काही लोक हनुमान चालिसा वाचायला पुण्यात पोहोचले. हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर उभे आहेत. हिंदुत्व कोणाला शिकवत आहात. आज पाहिले असेल कोल्हापूरचा निकाल लागला. या निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळी काही लोकांनी भोंगे हनुमान चालिसाचे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा कोल्हापूरला झाला नाही. एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे.
त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोक असे स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचे राजकारण संपले आहे. ज्या प्रकारचे राजकारण भाजप सध्या नवहिंदुत्ववादी ओवैसीकडून करू इच्छितो आहे, याचा काही उपयोग होणार नाही. कोल्हापूरचा निकाल हा त्याचा दाखला आहे. आता हिमालयात कोण जात आहे पाहुयात.
१९८७ मध्ये विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत प्रथम हिंदुत्वाची गर्जना केली होती. याची आठवण मला या निमित्ताने झाली. शिवसेनाप्रमुखांची भ्रष्ट कॉपी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण असे भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही लोक स्विकारत नाहीत. कारण भोग्यांचे राजकारण काय आहे, हे कोल्हापूरच्या जनतेने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व म्हणून दाखवून दिले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.