22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रमनसेकडून राज्यात ३ मे रोजी महाआरतीचे आयोजन - बाळा नांदगावकर

मनसेकडून राज्यात ३ मे रोजी महाआरतीचे आयोजन – बाळा नांदगावकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सरकारला मशिदीवरील भोंगे ३ तारखेपर्यंत खाली घेण्याच्या इशा-यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच याच मुद्यावर मनसे पदाधिका-यांची बैठक पार पडली.
ज्यामध्ये अयोध्या दौरा, भोंगा वाद, राज ठाकरेंची सुरक्षा ते अक्षय्य तृतीयेला महाआरती या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे,

राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘छेड़ोगे तो छोडेंगे नही’ असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्र लिहिले, असे नांदगावकर म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली असून अयोध्या दौ-यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांना बैठकीत दिले आहेत. तसेच अयोध्या दौ-यासाठी मनसे १० ते १२ रेल्वे आरक्षित करणार असून विशेष रेल्वेसाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र लिहिल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे. ‘शिवतीर्थ’वरील मनसे पदाधिका-यांच्या बैठकीत ‘जय श्रीराम’ चा नारा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या