25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयमला सत्तेत रस नाही

मला सत्तेत रस नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : असे अनेक नेते आहेत जे सकाळी उठल्याबरोबर सांगतात सत्ता कशी मिळणार, असे म्हणत रात्रीपर्यंत झोपी जातात. सकाळी उठून सत्ता कशी मिळवायची ते सांगतात. मात्र, मी सत्तेत जन्मलो; पण, मला एक विचित्र आजार आहे की मला त्यात रस नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हणाले.

शनिवार दि. ९ एप्रिल रोजी दिल्लीत कार्यक्रमादरम्यान भाजप सरकारवर निशाणा साधताना ते बोलत होते. संविधान हे भारताचे शस्त्र आहे. परंतु, संस्थेशिवाय संविधानाला अर्थ नाही. राज्यघटनेचे रक्षण केले पाहिजे असे तुम्ही म्हणता. मी म्हणतो की संविधानाचे रक्षण केले पाहिजे. मात्र, सर्व संस्था आरएसएसच्या ताब्यात आहेत. संस्था तुमच्या हातात नाही ना आमच्या हातात. संस्था तुमच्या हातात नसेल आणि आमच्या हातात नसेल तर संविधान आमच्या हातात नाही. हा हल्ला काही नवीन नाही. ज्या दिवशी महात्मा गांधींच्या छातीत तीन गोळ्या घातल्या त्यादिवशी हा हल्ला सुरू झाला, असेही राहुल गांधी म्हणाले.

लढाई नागरिकच करू शकते
लढाई नागरिकच करू शकते. परंतु, जोपर्यंत भारतातील नागरिकांच्या आत असलेला आवाज बाहेर पडत नाही, तोपर्यंत संस्थांवर नियंत्रण ठेवून संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाही. हे आजच्या भारताचे वास्तव आहे. जेव्हा संविधान चालत नाही, तेव्हा थेट दुखापत दुबळ्या लोकांवर होते. लढण्याची वेळ आली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या