23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeराष्ट्रीयपिता-पुत्रांसह सख्ख्ये भाऊ अन् नणंद-भावजय आमने-सामने

पिता-पुत्रांसह सख्ख्ये भाऊ अन् नणंद-भावजय आमने-सामने

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीला वेगळाच रंग चढला असून घरातील नाते संबंधही निवडणूकीच्या रिंगणात राजकीय आखाडा झाले आहेत. विधानसभेत आपले भविष्य आजमावण्यासाठी सख्खे भाऊ भाऊच नाही तर पितापुत्र आणि नणंद भावजय देखील परस्परांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणूकीतील चुरस वाढली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. गुजरात विधानसभेचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होईल. गुजरातमध्ये विधानसभेच्या या निवडणुकीत असे मतदारसंघ आहेत. जिथे भाऊ सख्या भावाविरुद्ध, वहिनी मेव्हणीविरुद्ध, तर मुलगा त्याच्या वडिलांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार याची चुरस निर्माण झाली आहे.

दोन सख्ख्ये भाऊ आमने- सामने
भरुच जिल्ह्यात अंकलेश्वर विधानसभा मतदार संघ भाजपसाठी सुरक्षित जागा मानली जाते. मात्र काँग्रेसने इथे भाजपची चिंता वाढवली आहे. भाजपने या मतदार संघातून विद्यमान आमदार ईश्वरसिंह पटेल यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने त्यांचेच लहान बंधू विजयसिंह पटेल यांना तिकीट देऊन भावा- भावांत भांडण लावले आहे.

जडेजाची पत्नी आणि बहीण समोरासमोर

जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपने क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी यांना उमेदवारी दिली. पण रिवाबा सोलंकी यांची नणंद आणि जाडेजाची मोठी बहीण नयना या उघडपणे सोलंकीच्या विरोध प्रचार करीत आहेत. नैना यांनी काँग्रेसचे उमेदवार दीपेंद्र सिंह जाडेजा यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांसाठी प्रचारही सुरू केला आहे. नैना या स्वत: गुजरात महिला काँग्रेसच्या महासचिव आहेत. जामनगरमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे नणंद आणि भावजयीतली राजकीय लढाई रंजक बनली आहे.

पिता-पुत्रांत झगडिया

सूरत जिल्ह्यातील झगडिया हा विधानसभा मतदारसंघ घरातच झगडा लावणारा ठरला आहे. या ठिकाणी पिता-पुत्रच परस्परांविरोधात दंड थोपटून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही राजकीय लढाई गुजरातचे नेते आणि भारतीय आदिवासी पक्षाचे प्रमुख छोटू भाई वसावा आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांच्यात होत आहे. छोटू भाई वसावा हे झगडिया मतदारसंघातून बीटीपीचे उमेदवार आहेत. तर त्यांचा मुलगा महेश वसावा जनता दल यूचे उमेदवार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या