24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयराहुल गांधींच्या मार्गावर गंगाजल टाकून शुद्धीकरण

राहुल गांधींच्या मार्गावर गंगाजल टाकून शुद्धीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी वैष्णोदेवीला १३ किलोमीटर पायी चालत जाऊन दर्शन घेतले. राजकीय वर्तुळासोबतच नेटिझन्समध्ये देखील राहुल गांधींच्या या देवी दर्शनाची आणि १३ किलोमीटर पायी प्रवासाची चर्चा रंगली होती. मात्र, राहुल गांधींच्या या प्रवासानंतर भाजपाने ते गेलेल्या मार्गाचे गंगाजल टाकून शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जम्मू-काश्मीर भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजपाच्या काश्मीरमधील युवा संघटनेने हे शुद्धीकरण केले असून त्यावरून आता देशाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला नारायण राणेंनी भेट दिल्यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाचे शुद्धीकरण केले होते. त्यानंतर राज्यात देखील मोठी चर्चा झाली होती. बीजेवायएमचे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख अरुण जामवाल यांनी ही सगळी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैष्णोदेवी स्थानाचे पावित्र्य भंग केले आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे यात्रा मार्गावर फडकावले. तसेच, राजकीय घोषणाबाजी देखील केली, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या