नागपूर : नागपूर विधानभवनासमोर एका तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांबद्दल अवमानजनक बोलले जात आहे. त्याच संतापामधून नागपूरमध्ये तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सभागृहामध्ये कामकाज सुरू असतानाच तरुणीने एकच गोंधळ करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गेटवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेत तरुणीला रोखले.