25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडावेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका विजय

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका विजय

एकमत ऑनलाईन

पाकिस्तानचा विक्रम मोडित
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद): वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुस-या वनडे सामन्यात भारतीय संघाने २ विकेटस्नी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने भारतासमोर ३१२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने विजयाचे लक्ष्य २ चेंडू राखून पार केले.

भारतीय संघातील ऑलराउंडर अक्षर पटेलने ३५ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर वादळी नाबाद ६४ धावांची खेळी केली. भारताच्या या विजयासह वनडे क्रिकेटच्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमाचीदेखील नोंद झाली आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवरील वनडे क्रिकेटमधील हा सलग १२ वा मालिका विजय आहे. क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणत्याही संघाने एका टीमविरुद्ध सलग इतक्या मालिका जिंकल्या नाहीत. याआधीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वनडे मालिका जिंकल्या होत्या. आता भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकून पाकिस्तानचा विक्रम मागे टाकला आहे.

कोणत्याही संघाविरुद्ध
सर्वाधिक वनडे मालिका विजय

> भारताचा वेस्ट इंडिजवर सलग १२ मालिका विजय
> पाकिस्तानचा झिम्बाब्वेवर सलग ११ मालिका विजय
> पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर सलग १० मालिका विजय
> दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सलग ०९ मालिका विजय
> भारताचा श्रीलंकेवर सलग ०९ मालिका विजय

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या