23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeशाळेतील क्वारंटाईन सेंटरची झाडाझडती

शाळेतील क्वारंटाईन सेंटरची झाडाझडती

एकमत ऑनलाईन

हिंगोली/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सुरक्षा रामभरोसे या मथळ्याखाली दै़ एकमतमधून जिल्हा परिषदेच्या शाळेतील क्वारंटाईन सेंटर नावापुरतेच असे वृत्त प्रसिध्द केले होते़ नेमके दुसºयाच दिवशी आठ पॉझिटीव्ह निघाल्याने एकमतच्या वृत्तामधून व्यक्त केलेली भिती खरी ठरल्याने शाळेतील क्वारंटाईन सेंटरची झाडाझडतीसाठी एक विशेष पथक नेमण्यात आले.

Read More  देशात तीन दिवसांत १५ हजार नवे रूग्ण

पिंपळदरी येथील शाळेत तब्बल १८ तास मुंबईहून आलेल्या मजुरांना प्रतिक्षा करावी लागली़ नंतर शाळेत कोणीही न आल्याने मजूर घरी पोहचल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने मिनी मंत्रालयातून या वृत्ताची गंभीर दखल घेत एका विशेष पथकाच्या माध्यमातून तपासणी सुरु केली़ याच बरोबर मुंबई, पुणे येथून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश देखील निघाले़ काल हिंगोली तालुक्यात विविध ठिकाणी मिनी मंत्रालयाच्या पथकाने भेटी दिल्यानंतर हे पथक औंढा तालुक्यात धडकले़ या पथकाने पिंपळदरी येथील शाळेतील क्वारंटाईन सेंटरला आज भेट दिली़ त्यानंतर ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रास भेट दिली व सरपंचाशी संवाद साधला.

यानंतर लोहरा येथील क्वारंटाईन सेंटर तसेच ग्रामपंचायतला भेट दिली़ यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या रामेश्वर येथील चेक पोस्टवर भेट देवून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या़ या पथकात उप मुख्यकार्यकारी अधिकारी पोदरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, कक्ष अधिकारी संतोष मिसळवार यांचा समावेश होता़ या पथकासमवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, गटविकास अधिकारी जगदीश साहू, गटशिक्षणाधिकारी अशोक पोफळकर, के़ डी़ देशमुख हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या