23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसैनिक मवाळ झालेला नाही

शिवसैनिक मवाळ झालेला नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मातोश्री हे शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. त्याला हात लावल्यास शिवसैनिक अंगावर येणार हे नक्की. आम्ही महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होऊ देणार नाही. राणा सध्या दुस-यांचे स्क्रिप्ट वाचत आहेत. शिवसेना सत्तेत असली तरी शिवसैनिक मवाळ झालेला नाही असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असे आव्हान आमदार रवी राणा यांनी काल दिले होते. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सकाळी शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.

रवी राणा यांच्यावर टीका करताना परब म्हणाले, हल्ली कोणीही उठते आणि मातोश्रीवर येण्याचे आव्हान देते. शिवसैनिक मजबूत आहेत. राणा कुटुंबीय अद्याप मातोश्रीला आव्हान देण्याबाबत छोटे आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं असा इशारा त्यांनी दिला.

हनुमान जयंतीच्या दिवशी येणार राणा दांपत्य मातोश्रीवर येणार होते. आम्ही त्यांना वेळही दिली होती. मात्र सांगितलेली वेळ त्यांच्या सोयीची नसेल, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, आम्ही तुमचे स्वागत करू असे आव्हानही परबांनी दिले. पुढे ते म्हणाले, सेनेला आव्हान देणे हे काही राणांचे काम नाही. राणा वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत.

महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. मातोश्री हे शिवसैनिकांसाठी मंदीर आहे. त्याला हात लागल्यास शिवसैनिक अंगावर येणार हे नक्की. शिवसेना सत्तेत असली तरी शिवसैनिक मवाळ झालेला नाही अशा इशाराही त्यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या