19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राठोड यांना कोरोनाची लागण

संजय राठोड यांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड महविकासआघाडीकाळात वादाच्या भोव-यात अडकले होते. दरम्यान, शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर महाविकासआघाडीतील नेत्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. या वादग्रस्त नेत्याला आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे ते घरीच क् क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

याचबरोबर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
‘‘रविवारी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असतील तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.’’ असे ट्विट संजय राठोड यांनी केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढे असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वादंग पेटले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या