25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयसंसद अधिवेशन वादळी ठरणार

संसद अधिवेशन वादळी ठरणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत चालवून चर्चा व सहमतीच्या मार्गाने विधायक कामकाज चालवावे, असे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज विरोधी पक्षनेत्यांना केले. ‘सरकारच्या विधायक कामकाजाला विरोधकांची नेहमीच साथ मिळते. मात्र विसंगत व जनतेसाठी नुकसानकारक अजेंडा रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारने केला तर विरोधक अजिबात ते सहन करणार नाहीत, असे संकेत विरोधकांकडून देण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या १८ जुलैपासून सुरू होणा-या व किमान १८ बैठकांचे १०८ तास कामकाज चालणा-या संसदीय अधिवेशनाच्या अगोदर शनिवारी लोकसभा सभापतींनी विविध पक्षनेत्यांची बैठक बोलावली.

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल आदी उपस्थित होते. बैठकांचे सत्र चालूच राहणार असून उद्या (ता. १७) पंतप्रधानांच्या उपस्थितीत आणखी एक सर्वपक्षीय बैठक व राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आणखी रंगतदार ठरणार हे स्पष्ट आहे.

विरोधकांनी अग्नीपथ योजना, बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास संस्थांच्या दुरूपयोगासह विविध मुद्यांवरून सरकारविरूध्द विलक्षण आक्रमक धोरण ठेवण्याची रणनीती आखली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाल्याने तो पक्ष अजूनही ‘कोपभवनात आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यसभेत बळ वाढलेला अरविंद केजरीवाल यांचा आप यांनाही पंतप्रधानांनी डिवचल्याने अधिवेशनावरील वादाचे ढग आणखी गडद झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या रणनीतीबाबत विरोधी पक्षनेत्यांशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने तेलंगणावर लक्ष केंद्रीत केल्याने केसीआर यांचा पारा चढला आहे. आगामी संसद अधिवेशनात विविध मुद्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती आखण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन, राजद नेते तेजस्वी यादव आदींशी त्यांनी चर्चाही केली असून ते अधिवेशनात दिल्लीत स्वत: डेरा टाकण्याचीही शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या