24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeमराठवाडासत्तारसाहेब मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात

सत्तारसाहेब मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात

एकमत ऑनलाईन

दानवेच्या वक्तव्याने सिल्लोडमधील सभेत चर्चेला उधाण
सिल्लोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका विधानाने मात्र सभेतील सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतले आणि तुम्ही लखपती झाले. मात्र मी लोकपती असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

आता दानवे यांनी विकास निधीच्या पैश्याचा उल्लेख केला की इतर कोणत्या पैश्याचा याची चर्चा सभेत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यापूर्वीही बंडखोर आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. त्यातच दानवे यांनी अशाप्रकारे विधान केल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले. यावेळी दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार साहेब, ज्यांना-ज्यांना तुम्हाला पक्षात आणायचे त्यांना पक्षात घ्या. तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतले असल्याने तुम्ही लखपती झाला आहात. मात्र तरीही मी लोकपती असून, रुग्णालयात राहूनसुद्धा निवडणून आलो असल्याचे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी दानवे यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. या सभेत बोलताना ते म्हणाले की, मी आणि अर्जुन खोतकर किती जवळचे मित्र आहे हे सर्वांना माहित आहे. आता तरी एकत्र यावे, असा टोला त्यांनी सत्तार आणि खोतकर यांना लगावला. काही झाले तरी दानवे यांनी केले असे म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी नको त्या माणसासोबत युती केली आणि एवढे सगळे घडले. आता हे नवीन आलेले सरकार हे अडीच वर्ष आणि पुढील पाच वर्षे काम करेल, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या