25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रहिंगोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस; नदीला पूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली

हिंगोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस; नदीला पूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली असून आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीच्या जवळ असणारे कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालं आहे.

कुरुंदा गावाच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर रात्रभर कायम राहिल्याने सकाळपर्यंत आसना नदीला पूर आला. या पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बाधित झाले.

या पुराचा फटका आसना नदीकाठच्या अनेक गावांना बसला आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पूरग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या