24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीय११ महिन्यात ७०० शेतकरी आंदोलकांचा मृत्यू

११ महिन्यात ७०० शेतकरी आंदोलकांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकेत कृषी कायद्यांच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-याच्या पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करत शेतकरी आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. मागील ११ महिन्यात शेतकरी आंदोलनात ७०० शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. शेतक-यांना वाचवण्यासाठी बायडन यांनी मोदींसोबत चर्चा करावी, अशी मागणी राकेश टिकेत यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

राकेश टिकेत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, आम्ही भारतीय शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहोत. आंदोलन करताना मागील ११ महिन्यात ७०० शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. आम्हा शेतक-यांना वाचवण्यासाठी हे कायदे मागे घेतले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत आमच्या प्रश्नांवर लक्ष द्याल. यावेळी राकेश टिकेत यांनी बायडन स्पिक्स अप फॉर फार्मर असा हॅशटॅगही वापला. इतकेच नाही तर टिकैत यांनी याआधीच्या एका ट्विटमध्ये अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अनिवासी भारतीय शेतक-यांनी मोदींच्या अमेरिकेच्या दौ-याविरोधात आंदोलन केल्याचेही ट्विट केले आहे.

भाजप सरकारचा घंटा वाजणार
शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत सध्या उत्तर प्रदेशमध्ये चांगलेच सक्रीय झालेले दिसत आहे. आता त्यांनी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचे विधान केले आहे. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. मागील १० महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतक-यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. ते बडनगरमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या