मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. मानेचे दुखणे सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री २२ दिवस रुग्णालयात होते.
एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा बंगल्यावर दाखल झाले.