37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाच वर्षांत जागतिक तापमानात १.५ अंश सेल्सिअसची वाढ

पाच वर्षांत जागतिक तापमानात १.५ अंश सेल्सिअसची वाढ

एकमत ऑनलाईन

लंडन : पुढील पाच वर्षांत जगाचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता पन्नास टक्के असल्याचे ब्रिटनच्या संशोधकांनी म्हटले आहे. हे तात्पुरते असू शकते. परंतु, तापमानात वाढ होणे हे चांगले लक्षण नाही, असे सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांनी जागतिक नेत्यांना तापमानात होणारी वाढ थांबवण्याचे आवाहन केले आहे.
वार्षिक १.५ डिग्री सेल्सिअसच्या जागतिक तापमानवाढ मर्यादेचे उल्लंघन केले जाऊ शकते. २०२२ ते २०२६ या काळात विक्रमी उष्मा असेल, असे संशोधकांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रथम पॅरिस हवामान करारावर नेत्यांनी स्वाक्षरी केली आणि नंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो येथे ‘सीओपी २६’ मध्ये जगाने आपल्या ध्येयासाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, असे अहवाल सूचित करतात.

अभ्यासात असे म्हटले आहे की, २०२२ ते २०२६ पर्यंत जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीच्या तुलनेत १.१अंश सेल्सिअस आणि १.७ अंश सेल्सिअस दरम्यान असू शकते. या कालावधीत एका वर्षात १.५ अंश सेल्सिअस पातळी तोडण्याची शक्यता ४८ टक्के किंवा सुमारे पन्नास टक्के आहे, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कार्बनडाय ऑक्साइड पातळीत वाढ
वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी हळूहळू वाढत आहे. पॅरिस करारात ठरवलेल्या या पहिल्या उंबरठ्यावर आपण जगाचे तापमान वाढताना पाहत आहोत. आपण जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे यूके मेट ऑफिसमधील संशोधक डॉ. लिओन हर्मनसन यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या