39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeउद्योगजगतएप्रिलमध्ये १ कोटी ८७ लाख कोटींचे जीएसटी संकलन

एप्रिलमध्ये १ कोटी ८७ लाख कोटींचे जीएसटी संकलन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिलमध्ये तब्बल एक कोटी ८७ लाख कोटी रुपयाचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे.

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण १,८७,०३५ कोटींच्या जीएसटी संकलनात सीजीएसटी संकलन ३८,४४० कोटी रुपये, एसजीएसटी संकलन ४७,४१२ कोटी रुपये, आयजीएसटी ८९,१५८ कोटी रुपये आणि उपकर म्हणून १२,०२५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. मार्च २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन १,६०,१२२ कोटी रुपये होते. एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यापूर्वी एका दिवसात व्यवहाराचा विक्रम गेल्या वर्षी २० एप्रिल २०२२ रोजी होता, जेव्हा एका दिवसात ९.६ लाख व्यवहार झाले होते, ज्यामध्ये ५७,८४६ कोटी जीएसटी वसुली दिसली होती अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.

१९ हजार कोटींची भर
गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,६७,५४० कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात १९,४९५ कोटी रुपये अधिक जमा झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या