28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून १ ठार

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून १ ठार

एकमत ऑनलाईन

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात वीज पडून तरुण शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. रामप्रसाद मारोतराव चव्­हाण (२८) असे त्­याचे नाव आहे. औंढा तालुक्यातील करंजाळा येथील रामप्रसाद चव्हाण यांचे जवळा बाजार शिवारात शेत आहे. सध्या शेतामध्ये हळद वाळविण्यासाठी ठेवण्यात आली होती.

शनिवारी मध्यरात्रीपासून वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हळद पिकाचे नुकसान होईल. या भीतीने रामप्रसाद चव्हाण व अन्य दोघे जण शेतात हळदीवर टाकण्यासाठी प्लास्टिक कागद घेऊन गेले होते. पहाटे अडीचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे रामप्रसाद एका झाडाखाली थांबले. झाडावर वीज कोसळली. त्यामुळे रामप्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जण या झाडापासून दूर असल्याने जखमी झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या