लातूर : लातूर जिल्ह्यात नव्याने १० रुग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. नुकतेच दहा कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या कमी झाली. पण, मंगळवारी लातूर जिल्ह्यात आणखी दहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
यात लातूर आणि उदगीरमधील प्रत्येकी दोन, तर निलंगा येथील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, लातूरमध्ये आढळून आलेला तो रुग्ण हा नुकताच दिल्लीहून काही दिवसांपूर्वी लातूरात आला आहे. तो ‘क्वारंटाईन’मध्ये होता. लातूरात आढळून आलेला दुसरा रूग्ण हा मुंबईहून आलेल्या कुटुबांतील सदस्य आहे. हे कुटूंब लातूरातील एमआयडीसी भागातील हडको कॉलनीतील आहे. या कुटूंबात याआधी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Read More WHO ने दिला इशारा : …कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल
संस्थेतील विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर म्हणाले, लातुर जिल्हयातील १९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, ५ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Reject करण्यात आला आहे.दरम्यान, १० नव्या पॉझिटिव्ह रूग्णांमुळे लातूर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १०४ झाली आहे. यातील ५५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४६ जण बरे झाले असल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.