24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home १० टक्के पीएफ योगदान सुविधा लागू

१० टक्के पीएफ योगदान सुविधा लागू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू असून कंपन्यांच्या व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, कंपन्यांना स्वत:च्या कर्मचा-यांसाठी १२ टक्के भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) योगदान भरणेही मुश्किल झाले आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने हे योगदान घटवून १० टक्के करण्यास अनुमती दिली होती. त्याची अधिसूचना लागू करण्यात आली.

या अधिसूचनेनुसार, मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी कंपन्यांनी देण्याचे पीएफ योगदान १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले गेले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाºयांकडून देण्यात येणारे पीएफ योगदानही १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. याचा थेट फायदा संघचित क्षेत्रातील ४.३ कोटी कर्मचाºयांना होणार आहे. या कर्मचा-यांना वरील तीन महिन्यांचे वेतन यामुळे अधिक येणार आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांत बाजारात ६ हजार ७५० कोटी रुपये खेळवले जाणार आहेत.

Read More  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी

कर्मचारी व कंपन्या यांचे पीएफ योगदान कमी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात केली होती. असे असले तरी, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रीय आस्थापने (सीपीएसई) आणि सार्वजनिक उद्योग (पीएसयू) यांच्याकडून येणारे पीएफ योगदान मात्र पूर्वीप्रमाणेच १२ टक्के राहणार आहे. ईपीएफ योगदानातील ही कपात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज आणि त्यातील मुदतवाढ लागू नसलेल्या कर्मचाºयांना लागू असणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या