33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या २२०० परदेशी नागरिकांवर १० वर्ष भारतबंदी

निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या २२०० परदेशी नागरिकांवर १० वर्ष भारतबंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : परदेशातील २२०० पेक्षा अधिक तब्लिगी जमातच्या नागरिकांना १० वर्षांसाठी बंदी घातली आहे. तब्लिगी जमात प्रकरणी दिल्ली पोलिसांनीच्या गुन्हा शाखाने ५४१ परदेशी नागरिकांचे नावाने १२ नवे आरोपपत्र दाखल केले आहे. परदेशी तब्लिगी जमातसाठी उपस्थित लोकांना सुरूवातीला व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोप लावण्यात आला आहे. तसेच एमएचएने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. तसेच त्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे.

Read More  पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

१३ मार्च रोजी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील बंगलेवाली मस्जिदमध्ये मोठ्या संख्येत परदेशी नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता. क्राइम ब्रान्चने गेल्या महिन्यात दिल्लीच्या एका न्यायालयात सांगितले की, त्यांनी टुरिस्ट व्हिसावर भारतात प्रवेश केला होता. तसेच मरकजच्या कार्यक्रमात सामील झाले होते. तसेच व्हिसा नियमांचे उल्लंघन केले. तसेच त्यांनी एका अशा स्थितीचे प्रतिनिधीत्व केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे आजार पसरला. तसेच भारतातील सामान्य जनतेचे जीवन धोक्यात टाकले. गृहमंत्रालयाने इतर राज्यांच्या पोलिसांना त्या ठिकाणी राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरूद्ध आपत्ती निवारण अधिनियमांतर्गत आणि परदेशी नागरिक अधिनियमन अंतर्गत कारवाई करण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या