22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयबँक घोटाळ््यातून देशात रोज १०० कोटींचे नुकसान

बँक घोटाळ््यातून देशात रोज १०० कोटींचे नुकसान

एकमत ऑनलाईन

गेल्या ७ वर्षांतील स्थिती, सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात
नवी दिल्ली : सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही, या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र, दुसरीकडे गेल्या ७ वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे झालेले नुकसान पाहिले तर आपले काही हजार रुपये त्यापुढे किती आहेत, याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करत बसेल.कारण देशात रोज १०० कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ््यातून झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे ५० टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. २०२१-२२ या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारत भरातील शाखांमध्ये ४ हजार १९२ कर्मचा-यांनी ७ हजार कोटींचे घोटाळे केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली आहे.

२२६ कोटींचे घोटाळे
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. या घोटाळ््यात १२१ कर्मचा-यांनी २२६ कोटींचे घोटाळे केल्याचे समोर आले आहे.

१०,८०४ कर्मचा-यांचा राजीनामा
या शिवाय वेगवेगळ््या कारणांनी स्वेच्छानिवृत्ती घेणारे, राजीनामा, बडतर्फ कर्मचा-यांची संख्याही मोठी आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ४४४३, २०१८-१९ मध्ये १७५४, २०१९-२० मध्ये १३३०, २०२०-२१ मध्ये ९१६ आणि २०२१-२२ मध्ये १२७७ अशा एकूण ९७२० कर्मचा-यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. १२१४ जणांना वेगवेगळ््या कारणांनी बडतर्फ करण्यात आले. २०१७-१८ मध्ये एकूण २३३२, २०१८-१९ मध्ये १५७७, २०१९-२० मध्ये २४५०, २०२०-२१ मध्ये २०५९ आणि २०२१-२२ मध्ये २३८६ अशा एकूण १०,८०४ कर्मचा-यांंनी राजीनामा दिला.

४७,१२१ कर्मचारी निवृत्त
२०१७-१८ मध्ये एकूण ११,५२४, २०१८-१९ मध्ये ११,६४७, २०१९-२० मध्ये ११,५२५, २०२०-२१ मध्ये १०,८५१ आणि २०२१-२२ मध्ये १५४७ असे एकूण ४७,१२१ कर्मचारी निवृत्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

८९३ कोटींची रक्कम दाव्याविना पडून
बँकेत व्यवहार न झाल्यामुळे, वारसदार मृत झाल्याचे न कळवणे आदी अनेक कारणांमुळे अनक्लेम रक्कम पडून राहाते. संपूर्ण देशात बँकेची एकूण १२ लाख ९० हजार ८३८ खाती असून त्यात ८९३ कोटी ३५ लाखांची रक्कम विना दावा पडून असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षकाच्या ३९३४ जागा रिक्त
देशभरात स्टेट बँकेची एकूण ६५ हजार ६९० एटीएम आहेत. मात्र त्यापैकी किती बंद करण्यात आली याची माहिती बँकेने संकलीत केलेली नाही. बँकेत एकूण ३९३४ सुरक्षा रक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या