22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयदेशात १०० कोटी लसीकरण पूर्ण

देशात १०० कोटी लसीकरण पूर्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला. ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीची रहिवासी आहे.

दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा १०० कोटीवा डोस देण्यात आला. हा डोस अरुण रॉय यांना देण्यात आला. अरुण रॉय वाराणसीचे रहिवासी असून ते दिव्यांग आहेत. मात्र त्यांची नाराजी अशी की त्यांना पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली नाही. अरुण रॉय यांनी सांगितले की, जेव्हा ते दिल्लीला आले होते, तेव्हा देशात ७० कोटी लसमात्रा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ठरवले की आपण १०० कोटीवी लसमात्रा घ्यायची. रॉय दिल्लीमध्ये आपल्या एका मित्राकडे आले होते. त्या मित्राला त्यांनी लसीसाठी नोंदणी करायला सांगितले.

त्यानंतर दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांची नोंदणी झाली. जेव्हा त्यांनी लसीचा १०० कोटीवा डोस घेतला, तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली. जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना विचारले की आतापर्यंत तुम्ही लस का घेतली नव्हती? तेव्हा रॉय यांनी सांगितले की, लसीबद्दल त्यांच्या मनात गैरसमज होता. मात्र जेव्हा त्यांना कळलं की ७० कोटी लोकांनी लस घेतली आहे, त्यावेळी हा गैरसमज दूर झाला. त्यानंतर त्यांनीही लस घेण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या