भोकर : प्रतिनिधी
पवार काँलनीतील एका युवकांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने भोकरसह परिसरातील नागरिकांनी,व्यापा-यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूतीर्ने घोषित केलेल्या चार दिवसांच्या जनता कफ्यूर्ला १००% प्रतिसाद देऊन आपआपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवले आहेत.
कोरोना महामारीचा भोकर मध्ये पाहिल्यांदाच शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असून या महामारीवर त्वरित विजय मिळवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरवासीयांनी दि.२१ मे ते २४ मे दरम्यान जनता कर्फ्यु पाळण्याचा निश्चय केला असून या जनता कफ्युर्ला सर्वांनी १००% प्रतिसाद दिल्याने सर्व सामान्य लोकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
Read More स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता!
बाजारपेठेतील सर्व दुकानदार, व्यापारी, कामगार या सर्वांनी आपापली प्रतिष्ठाने,दुकाने बंद ठेवून जनता कफ्युर्ला उस्फूर्त साथ दिली.दरम्यान कोरोना बाधितावर भोकर येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांनाही कॉरनटाईन करून तिथेच ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या स्वॅबचे नमुनेही घेण्यात आले आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाच्या घरा शेजारील संपर्ककातील ५० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून भोकर शहरासह ग्रामीण भागातुन आलेल्या ४१९३ तर शहरी भागात ८०५ व्यक्तींना त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तेंव्हा जनतेनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, अफवा पसरवु नये तसेच अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडु नये तशेच प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करावे आणि केंद्र शासन व राज्य शासनाकडून ज्या मार्गदर्शक सुचना येतील त्यांचे तंतोतंत पालन करावे असे अहावान उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भरत सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक .डॉ. अशोक मुंडे ,पोलिस निरिक्षक विकास पाटील यांनी सर्व नागरिकांना केले आहे.