22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी

राज्यात पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात यंदा मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असून सर्वदूर चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत सुमारे १०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जुलैपासून आत्तापर्यंत पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पंधरा दिवसात १०२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकज जण बेपत्ता आहेत. यामध्ये १८१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात २७ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. या जिल्ह्यांतील २५० हून अधिक गावांमध्ये नद्यांचे पाणी घुसले आहे.

राज्यात आतापर्यंत सुमारे १४०० घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ४४ घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, तसेच मुसळधार पावसामुळे १८१ जनावरे दगावली आहेत. सध्या जवळपास आठ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून सुमारे दोन हजार नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी जवळपास ५२ मदत कँप उभारण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या