24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराज्यातील ७ लाख १५ हजार ऑटोरिक्षा परवाना धारकांना १०७ कोटींची मदत -अनिल...

राज्यातील ७ लाख १५ हजार ऑटोरिक्षा परवाना धारकांना १०७ कोटींची मदत -अनिल परब

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२०(प्रतिनिधी) करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घालाव्या लागलेल्या निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या ऑटोरिक्षा परवाना धारकांना १०७ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. ७ लाख १५ हजार लोकांना याचा लाभ मिळणार आहे.कोरोनाची दुसरी लाट थोपण्यासाठी निर्बंध लागू करताना ऑटोरिक्षा परवाना धारकांसह विविध घटकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांची बैठक मंत्रालयात झाली.

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.या करीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.

बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,असे आवाहन परब यांनी केले.

जांबूड येथील स्मशाभूमीची दुरवस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या