28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून ११ ठार

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून ११ ठार

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये बुधवार सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ यांनी दिली.

शहजाद लतीफ यांनी सांगितले की, या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना मंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुंछ दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी अधिका-यांना दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या