23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home राष्ट्रीय हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मोठी दुर्घटना, क्रेन कोसळल्याने 11 कामगारांचा मृत्यू

हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मोठी दुर्घटना, क्रेन कोसळल्याने 11 कामगारांचा मृत्यू

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी असलेल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. याठिकाणी क्रेन कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व लोक हे तिथले कामगार आहेत. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यात क्रेन कोसळल्याचे दिसून येत आहे. एक प्रचंड क्रेन शिपयार्डमध्ये कोसळल्याने सध्या या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, बचाव आणि मदत कार्य चालू आहे. सध्या ढिगाराखाली अडकलेल्या काही लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

ही घटना पाहून मंत्री अवंती श्रीनिवास यांनी अधिकाऱ्यांना प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या प्रचंड क्रेनवर एकूण 18 मजूर काम करत होते. दरम्यान, अचानक क्रेन तुटून ती खाली कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 मजूर ठार झाले आहेत. जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल केले आहे. क्रेन लोड करण्याचा प्रयत्न चालू असताना हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयनुसार डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेची माहिती दिली. हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याने इतका मोठा अपघात झाल्याचे त्याने सांगितले.

अपघात झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी, विशाखापट्टणम जिल्हाधिकारी व शहर पोलिस आयुक्तांना क्रेन अपघाताच्या घटनेवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, याआधी मे मध्ये विशाखापट्टणम येथील एका बहुराष्ट्रीय केमिकल प्लांटमधील गॅस गळतीमुळे, आजवर 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे 800 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गॅस गळतीमुळे तीन किलोमीटरच्या परिघात असलेल्या 5 गावात 1000 हून अधिक लोक आजारी पडले आहेत असे सांगितले जात आहे.

Read More  नीती आयोगाचा सल्ला : तीन मोठ्या सरकारी बँकांचे खाजगीकरण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow