22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमेळघाटमध्ये गेल्या ५ महिन्यात कुपोषणाने ११० बालकांचा मृत्यू

मेळघाटमध्ये गेल्या ५ महिन्यात कुपोषणाने ११० बालकांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

अमरावती : कुपोषण पाचवीला पुजलेल्या मेळघाटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये गेल्या ५ महिन्याच्या काळात ११० बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. तर दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण परिस्थीती समोर आली आहे. मागील पाच महिन्यात ११० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवनीत राणायांच्या मतदार संघातील ही घटना असून, विशेष म्हणजे एकट्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ११० बालकांपैकी शून्य ते सहा महिने या वयोगटातील ७७ बालकांचा समावेश आहे. तर ३३ बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते. सोबतच दोन गरोदर मातांचा ही यात मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्­य शासनाकडून जननी-शिशू सुरक्षा योजना, ग्राम बालविकास केंद्रे, जीवनसत्त्वपुरवठा, जंतनाशक मोहीम, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र, भरारी पथक योजना, लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अशा डझनांहून अधिक योजना अस्तित्वात असताना मेळघाटात दरवर्षी सुमारे २०० ते ३०० बालके मृत्यूच्या दारात ढकलली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या