25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे १२ आमदार फुटलेत - शहाजी पाटील यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटलेत – शहाजी पाटील यांचे मोठे वक्तव्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात असून एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा धक्कादायक खुलासा करत काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्के… फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी वेगळाच दणका उडवून दिला आहे. ते म्हणाले, सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे.

आताही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीबाबत धक्कादायक वक्तव्य करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. एका मराठी न्यूज वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

याशिवाय पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक बडा नेता देखील आमच्याकडे येणार आहे. त्यामुळे पुन्हा एक मोठा दणका बसणार आहे, असे पाटील यांनी सांगितल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील आमदार पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटलेला नाही. असा कोणताही विषय नाही. आमच्या पक्षाबाबत वेगवेगळ्या अफवा पसवरल्या जात आहेत. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या