24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात १२ जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात १२ जण जखमी

एकमत ऑनलाईन

पनवेल : मुंबई-पुणे महामार्गावर पहाटे ३ च्या सुमारास दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण १२ जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात खालापूर येथे झाले आहेत. सर्व जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या भागातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.

पहिली घटना एका लक्झरी बसची आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओल्या रस्त्यामुळे वेगात जात असलेली ही बस घसरली. या घटनेत बसमधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर, दुस-या घटनेत फोर्ड इको कारचा टायर फुटला. यानंतर कारमध्ये प्रवास करणारे ४ जण महामार्गावर उभे राहून टायर बदलत होते. मात्र, याचवेळी तिथे मोठा अपघात झाला.

गाडीमधील लोक टायर बदलण्यासाठी खाली उतरलेले असताना गस्त घालणा-या होमगार्डची गाडी तिथे आली. या गाडीमध्येही दोनजण होते. हे दोघेही तिथे उतरले. हे सहाची लोक हायवेवर उभा होते. त्याचवेळी मागून अज्ञात वाहनाने जीप आणि फोर्ड इको स्पोर्ट्स कार या दोन्हींना धडक दिली. त्यामुळे घटनास्थळी असलेले सर्व सहाजण या अपघातात जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या