21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयशिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेनाचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहिले आहे. या पत्रात स्वतंत्र गट स्थापन करण्याची खासदारांनी मागणी केली आहे. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आमच्याकडे असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत १२ खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. जे अडीच वर्षापूर्वी झाले पाहिजे ते आम्ही आज केले आहे. १२ खासादारांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते. लोकाभिमुख निर्णय घेण्यात सुरुवात केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी आहे त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या