26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय१२ आदिवासी समुदाय अनुसूचित जमातीत

१२ आदिवासी समुदाय अनुसूचित जमातीत

एकमत ऑनलाईन

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातींसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील अनेक आदिवासी समुदयांचा समावेश अनुसूचित जामातींमध्ये करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.

कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना याची माहिती दिली. ठाकूर म्हणाले, सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्सगिरी क्षेत्रातील हट्टी समुदयाच्या लोकांची अनेक काळापासून आपल्याला अनुसूचित जमातींचा दर्जा मिळावा, अशी मागणी होती. उत्तराखंडमधील जौनसार भागातील अशाच समुदयाला हा दर्जा मिळालेला आहे.

मंत्री अर्जुन मुंडा यांनीही बिझिया समुदायाला ओडिशा आणि झारखंडमध्ये अनुसुचित जमातींमध्ये स्थान देण्यात आले आहे. पण छत्तीसगडमध्ये या समुदायाचा अनुसूचित जमातीत समावेश नाही. या संदर्भात सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यांकडून शिफारस येणे, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याशी सल्ला मसलत तसेच आंतर मंत्रालयाशी चर्चेनंतर हे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवले गेले आणि त्याला मंजुरी देण्यात आली.

या जमातींचा समावेश
अनुसूचित जमातींमध्ये समावेश झालेल्या समुदायांपैकी तामिळनाडूच्या पर्वतीय क्षेत्रातील नारिकुर्वर आणि कुरुविकरण, कर्नाटकातील बेट्टा-कुरुबाला कडू-कुरुबाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या १३ जिल्ह्यांमधील गोंड जातीच्या लोकांना अनुसूचित जातीमधून अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील निवडणूक जाहीरनाम्यात हा बदल करण्याचे आश्वासनंही दिले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या