25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Home55 वर्षावरील 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी

55 वर्षावरील 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी

एकमत ऑनलाईन

पुणे | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 50 वर्षावरील 23 हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर 55 वर्षावरील 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी दिली आहे, या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील कंटेन्मेंट झोन आणि येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील कोविड सेंटरला गृहमंत्री देशमुख यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधला. कोरोनामुळे राज्यात पोलिसांचे अनेक बळी गेले आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार 60 ते 65 लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पोलिसांना कोरोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास 1 लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहितीही यावेळी अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Read More  राज्यात पॉझिटिव्ह रूग्णाला निगेटिव्ह ठरवणारं रॅकेट-प्रवीण दरेकर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या